आर. जे. पवार यांचा उत्कृष्ट तहसिलदार पुरस्काराने सन्मान...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 02, 2023 14:44 PM
views 237  views

कणकवली : महाराष्ट्र शासन महसूल दिन गौरव २०२३ निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग सन २०२२-२३ या वर्षात उत्कृष्ट काम करुन महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे उत्कृष्टपणे काम करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल महसुल दिनानिमित्त कणकवली तहसिलदार रमेश पवार यांना उत्कृष्ट तहसिलदार हा पुरस्कार देवून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कणकवली महसूल विभागाचे कर्मचारी समीर राणे, तलाठी गोजिरी गोडे यांनाही उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देत गौरवण्यात आलं.