
देवगड : आर. जे. पवार यांची पुन्हा देवगड तहसीलदारपदी बदली झाली आहे. तहसिलदार आर. जे. पवार हे लोकाभिमुख सेवा देणारे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन काम करतात. कणकवली तालुक्यामध्ये तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार या विविध पदावर सेवा दिली. त्यांनी जनतेची कामे करत आपली जनमाणसामध्ये एक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यानंतर त्यांची देवगड येथे बदली झाली होती. देवगड येथून पवार यांची अंधेरी उपनगर येथे बदली झाली होती. परंतु तहसिलदार सवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज महाराष्ट्र शासनाने केले. त्यामध्ये पुन्हा आर.जे.पवार यांची देवगड तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड येथे आपल्या कामाची चांगली चुणुक दर्शविणारे तहसीलदार आर. जे. पवार यांची बदली निवडणुक काळात मुंबई उपनगर अंधेरी येथे संजय गांधी योजनेचे तहसीलदार या पदावर झाली होती.