तहसीलदार आर.जे .पवार यांची मुंबई अंधेरीत बदली !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 07, 2024 15:27 PM
views 300  views

देवगड : देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांची प्रशासकीय बदली झाली असून. मुंबई अंधेरी येथील संजय गांधी योजना तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

तहसीलदार आर.जे .पवार यांची बदली प्रशासकीय आहे. चार वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम केले. आणि तीन वर्षे कणकवली मध्ये तहसीलदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल सत्कार देखील करण्यात आला.प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांनी लोकांना सोबत घेऊन चांगले काम केले होते . त्यामुळे जनसामान्यांमध्ये चांगला अधिकारी म्हणून ओळख झाली . देवगडमध्येही त्यांनी येथील लोकांना सोबत घेऊन चांगला काम चांगले करून दाखवले होते.