
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हात २ जानेवारी पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आज ११ जानेवारी ला शेवटच्या दिवशी महिला पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली. आजच्या दिवशी तब्बल १ हजार पेक्षा जास्त महिला उमेदवार मध्यरात्रीपासूनच पोलीस भरती साठी रांगेत होत्या. या महिला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, नागपूर गोंदिया, बीड, गडचिरोली,पुणे, यवतमाळ, भंडारा या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातुन महिला उमेदवार दाखल झाल्या आहेत.
२ जानेवारीपासून १० जानेवारीपर्यंत वाहन चालक व पुरुष शिपाई पदाची भरती प्रक्रिया पार पडली. आज शेवटच्या दिवशी महिला पोलीस भरती प्रक्रिया पार पडत आहे
हि भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुयोग्य असे नियोजन केले आहे. प्रथम आलेल्या उमेदवारांचे ओळखपत्र आणि प्रवेश पत्र पाहून त्यांना आत मध्ये सोडले जाते व नंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले जात आहे. त्यामुळे नवे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया शिस्त पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.