आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा

कणकवली धान्य दुकानानवर आनंदाच्या शिधाचे वाटप
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 25, 2022 14:32 PM
views 280  views

कणकवली :-शिंदे व फडणवीस सरकारने केलेल्या घोषणेनंतर सिंधुदुर्गात आनंदाचा शिधा  वाटप करण्यात येत आहे. कणकवली शहरातील धान्य दुकानावर या आनंदाचा शिधाचे वाटप करण्यात येत असून नागरिकांनी हे किट घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. यामध्ये डाळ तेल साखर आणि रवा अशा चार वस्तू मिळत असून त्याची किंमत फक्त शंभर रुपये आकारले जात आहे.

हे घेण्यासाठी धान्य दुकानावर  रेशन कार्ड धारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.त्यामुळे  रेशन दुकानदारांना हे कीड  कार्डधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत होती.