
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात रेशन धान्य दुकानावर सर्व्हर डाऊनच्या नावाखाली येथील घटगेवाडी येथील रेशनधारकांना घरदार सोडून रेशन दुकानावर तासनतास रहावे लगात असल्याने नागरिकांनी शासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत रेशन वितरणाची मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे.
दोडामार्ग तालुका म्हटला की नेट, लाईट, पाणी व आता रेशन धान्य यांसारख्या समस्यांना येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याचेच उदाहरण म्हणजे तालुक्यातील घोटगेवाडी येथील रेशन धारकांचे थम लागत नसल्याने नागरिकांना तासनतास रेशन दुकानावर हेलपाटे मारावे लागत आहे. नागरिकांना आपली शेतीची कामे सोडून रेशन धान्य दुकानावर थम लावण्यासाठी दिवस भर बसावे लागत आहे. तालुक्यातील घोटगेवाडी नव्हे तर बऱ्याच श्याम धान्य दुकानावर रेशनधारकांचे थम लागत नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक वेळी सर्व्हर डाऊन, नेट नाही या सर्व कारणामुळे येथील रेशनधारकांना आपली कामे सोडून बसावे लागत आहे. त्यामुळे रेशन धान्य ऑनलाईन पद्धतीने बंद करून ऑफलाईन द्यावे अशी मागणी तालुक्यातून नागरिकांनी केली आहे.