कलमठ बिडयेवाडीत आढळला अजगर

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 01, 2023 11:29 AM
views 144  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथील संजय पुजारे यांच्या घराच्या अंगणात अचानक गाडीसमोर सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हा ८ फूट लांबीचा अजगर दिसून आला. त्यानंतर सर्पमित्र रमेश वर्दम, सहकारी कुंदन यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्या अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी रुपेश गायचोर यांनी अजगर पकडण्यासाठी मदत केली. अजगराला रात्री सर्प मित्रांनी  पकडल्यानंतर भयभीत झालेल्या पुजारे कुटंबियानी सुटकेचा निःश्वास टाकला.