केंद्रशाळा तोरसोळेच्या पूर्वा पवारची नवोदय विद्यालयासाठी निवड..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 05, 2024 12:48 PM
views 199  views

देवगड : फेब्रुवारी सन २०२३-२४  या शैक्षणिक वर्षांत घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत केंंद्र शाळा तोरसोळे नं.१ या प्रशालेतून ७ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी पुर्वा गणेश पवार या विद्यार्थीनीने नेत्रदीपक यश संपादन केले व  तीची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनीस मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण ,उपशिक्षिका  सुनीता मुसांडे , वर्गशिक्षक सुनिल कोदले, पदवीधर शिक्षक किरण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या  या निवडीबद्दल सरपंच तेजस्विनी पवार,उपसरपंच सुहास पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  संजीवनी ठुकरुल ,उपाध्यक्ष शुभ्रा मेस्त्री ,माता पालक संघ अध्यक्ष श्रीम.रिया पवार,पालक शिक्षक संघ अध्यक्ष श्रीम.जान्हवी सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्री.देवदत्त कदम, शिक्षक वर्ग,पालक व ग्रामस्थ यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.