पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचा ८६ वी पुण्यतिथी समारंभ ४ जुलैला

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 19:35 PM
views 265  views

सावंतवडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीच्या माध्यमातून मंगळवार ४ जुलै २०२३ रोजी स. ९ वा. श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचा ८६ वी पुण्यतिथी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हा सोहळा संपन्न होत आहे.

या समारंभाच अध्यक्षस्थान श्रीमंत खेमसावंत भोसले राजाबहादूर हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. माधव राजवाडे, प्राचार्य, साठ्ये कॉलेज, मुंबई हे उपस्थित राहून "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व स्वायत्त महाविद्यालये" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व 'खेमराजीय' या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित रहावं अस आवाहन चेअरमन ह.हा.श्रीमंत शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब), कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांसह सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल व नियामक मंडळ सदस्य व सर्व सभासदांनी केलं आहे.