विक्रांत पाटील यांच्या हस्ते शिवलिंगावर पूजा, अभिषेक | संजू परब यांच्या हस्ते महाआरती

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महाकाल मंदिर कामांच्या लोकार्पणाचे निमित्त
Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2022 18:37 PM
views 266  views

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या परिसरात सुशोभीकरण आणि सुविधा निर्माण केलेल्या विविध कामांचे लोकार्पण होते आहे. यानिमित्त आज संध्याकाळी सावंतवाडीत श्री नारायण मंदिरामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या हस्ते शिवलिंगावर पूजा, अभिषेक करण्यात आला. तर माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 

उज्जैन येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या परिसरात सुशोभीकरण आणि सुविधा निर्माण केलेल्या विविध कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी मंडलात शिवलिंगावर पूजा, अभिषेक करण्यात आला. भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाई सावंत, प्रभाकर राऊळ, रवींद्र मडगांवकर आदींच्या उपस्थितीत महा आरती करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाकाल मंदिरातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आल. यावेळी भाजप जिल्हा प्रवक्ते, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, बंटी पुरोहित, अजय सावंत, मनोज नाईक, आनंद नेवगी यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.