केसरी शाळेत 'बोंडू' हस्तलिखिताचे प्रकाशन !

महिला दिनी पार पडले 'आई' संमेलन
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 09, 2023 19:50 PM
views 136  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केसरी या प्रशालेत महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'आई' संमेलनात मुलांच्या अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या 'बोंडू' या मुलांच्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन करण्यात आले.

मुलांमध्ये असणाऱ्या अंगभूत कलाविष्कारानी मुलांनी   हस्तलिखितामधून मनमोकळेपणाने विविध पैलूंवर भाष्य केले आहे. मुलांच्या अभिव्यक्तीला  व्यासपीठ मिळवून प्रोत्साहन देऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पदवीधर शिक्षक दीपक राऊळ यांनी 'आई' संमेलनातून मुलांमध्ये संस्कार मूल्ये रुजवलीत. आईचा हातात हात घेऊन डोळ्यात पाहून आईबद्दल भाव व्यक्त करावे, अशा स्तुत्य उपक्रमात आईचे मुलांकडून पाद्य पूजन करुन मुलांनी आपल्या आईप्रती असलेल्या भावना व्यक्त करून सर्वांचीच मने जिंकली.

  यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष रेश्मा सावंत, माता - पालक उपाध्यक्ष प्रियांका सावंत, माता  सदस्य संगीता पाटील तसेच ललिता सोमण, पल्लवी सावंत, शुभांगी सावंत, नेहा नाईक, सारिका जंगले, प्रियांका पाटील, कल्याणी जंगले, गीतांजली सावंत, अर्पिता केसरकर, किर्ती कासले, प्रेरणा राणे, रुपाली जंगले, मनीषा मेस्त्री, स्नेहल लांबर आदी आई पालक उपस्थित होते.

 मुख्याध्यापक सुभाष सावंत, रागिणी परब, रोशन  राऊत, वृषाली पाटील उपस्थित होते. तर   वैष्णवी, सृष्टी, तनिष्का, प्रियांका, सुहानी, पूर्वा, रिया, आर्या, ऐश्वर्या, सुमन, आकांक्षा, प्रदीप, विजय, सुनील, भगवान, साईक्षा, तन्मयी, पूजा, अपूर्वा, वैदेही, शिवानी, सलोनी, राधिका, इत्यादी मुलांनी सादरीकरण करून आई संमेलनात अधिकच रंगत आणली. यावेळी  सृष्टी नाईक व तनिष्का पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष सावंत यांनी तर  कार्यक्रमाचे आभार रोशन राऊत यांनी मानले.