अर्चना घारेंचा गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनसंपर्क कायम !

Edited by: विनायक गावस
Published on: September 24, 2023 15:33 PM
views 126  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवत गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यात घरोघरी भेट देत गणरायाच दर्शन घेत आरती, भजनात सहभाग घेतला. 

कोकणात गणेशोत्सवात घरघरात गणरायाचे उत्साहात स्वागत केले जाते. मित्र आप्तेष्टांच्या घरी जाणे, गणरायाची आरती करणे या माध्यमातून ऋणानुंध अधिक घट्ट होतात अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात आनंद व समृध्दी यावी अशा सदिच्छाही सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.