
सावंतवाडी : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा उघडण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असे विधान करून महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपदावर असलेले भाजपचे वाचाळ मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध येथील समाज मंदिरकडेमंत्री पाटील यांनी नुकतेच हे विधान करून महापुरुषांचा अपमान केल्याने राष्ट्रीय महापुरुषांचा अवमान करण्याची स्पर्धा जणू भाजपच्या नेत्यात सुरू असून, नामदार पाटील यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी संघटीत होत शनिवारी दुपारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे जाहीर निषेध व्यक्त केला.
प्रारंभी राष्ट्रवादी शहराध्यक्ष पुंडलिक दळवी व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यानंतर अॅड. एस. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक करून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवमान केलेल्या प्रसंगाचे स्पष्टीकरण केले. त्यानंतर पुंडलिक दळवी यांनी तसेच पत्रकार व प्रेरणाभूमीचे कार्यकर्ते मोहन जाधव यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असल्याने सनदशीर मार्गाने सदर घटनेचा निषेध आम्ही प्रतिनिधिक स्वरूपात करीत असल्याचे सांगून अशा वाचाळ वीराने यापुढे तरी आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष युवती अध्यक्ष सावली पाटकर, सामाजिक कार्यकर्ते आर. जे. चौकेकर, यशवंत डिंगणेकर यांच्यासह असंख्य आंबेडकर चवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.