'त्या' बातमीवर जनसामान्यांच्या 'कमेंट्स' !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2025 20:09 PM
views 38  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक अवैध मार्गाला का वळतायत? याबाबत कोकणसादच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला होता. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेल पाऊलच या पिढीला बरबाद होण्यापासून रोखण्यासाठी जालीम उपाय ठरणार आहे. सोशल मिडियावर यासाठी आलेल्या कमेंट्समधून देखील ते स्पष्ट झाले आहे.

यामध्ये पंकज शेलार म्हणाले, झटपट पैसे, राजकारणी लोकांची फुस. तर हे धंदे सुरू करणारे कोण? राजकारणी लोकांच्या मागुन फिरायला पाहिजे ना कोणीतरी अशी कमेंट परेश मुणगेकर यांनी केलीय. सिंधुदुर्गमध्ये जास्त लोक सरकारी नोकरीला कुठले आहेत, तर सांगली सातारा येथील आणि आपले ??? अस आरती मुंडये म्हणतायत. कामधंदा किंवा व्यवसाय करायला नको, आज बाहेरची लोक येऊन उद्योगधंदा व्यवसाय करून पैसा आपल्या राज्यात घेऊन जात आहेत, त्यांच्या सारख आपण काहीतरी शिकायला हवं असं मत सदानंद पडवे यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील किती उमेदवार भरती करण्यात आले ते पण नंतर जाहीर करा, फक्त पॅटर्न नको स्थानिक युवकांना किती लिपिक पदावर घेण्यात आल ते नंतर जाहीर करा एवढेच अशी कमेंट सुहास मांजरेकर यांनी केली आहे. 

तसेच अमेय राणे म्हणाले, आपले राजकारणी याला कारणीभूत आहेत. त्या देशावर बघा सहकारातून काय झाले. आपले लोक फक्त राजकारणी लोकांच्या पाठी फिरून आपली किंमत कमी करून घेतात. तर, अजित जाधव म्हणाले, अवैध धंदे कुठे कुठे चालू आहेत हे त्या त्या परिसरातल्या सर्वांना माहित आहे. फक्त कोण बोलत नाही. सिंधुदुर्गात आहे काय? ना नोकरी ना धंदा, सगळे दारिद्र्य सिंधुदुर्गात, कोणा मंत्र्यांना काळजी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची? अस संदीप देसाई म्हणालेत. आमचे नेते जसे. तसे त्यांचे आम्ही अनुयायी. काय आदर्श ठेवलाय आमचे समोर अशी वामन प्रभू यांनी कमेंट केलीय.

 तसेच संकेत गावडे म्हणाले, का वळतायेत?? nice question... anyways एकदंरीत पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये हवे तेवढे रोजगार नाहीत, नीट काम नाही किवा काम आहे पण पगार नाही वाढत्या महागाई मुळे लोकांना पैसा पुरत नाही मग लोक किवा तरुण अजून करणार तरी काय? आणि प्रशासन काय झोपा काढते काय? मीडिया ला दिसताय की अवैध धंदे चालू आहेत मग प्रशासनच्या डोळ्याना काय पट्टी बांधलीय का?. तर, मेहनत करायला नको झटपट पैसे कमवायचे आणि दारू जुगार खेळण्यासाठी उडवायचे गोव्याची दारू सगळ्यात बाद बाहेरून येऊन यूपी बिहार चे लोक मेहनत करतात इथल्या पोरांना काम नको आहे, अस प्रफुल्ल सावंत यांनी म्हटले आहे. स्वप्नील खडपे म्हणाले, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री पूर्ण सिंधुदुर्ग मध्ये सत्ता, उद्योग मंत्री, मसुलमंत्री पुन्हा खासदार. एवढीमंत्री असताना MIDC आणू शकत नाही तर म काय करतील मूल. तर अजय लाड यांनी कमेंट केलीय, हे जे काय धंदे आहेत ना ते धंदे सगळे राजकारण्यांचेच आहेत तुम्ही जर एवढी म्हणताना आम्ही हे बंद करू ते बंद करून तुम्ही आधी पाहिलं आमच्या सिंधुदुर्गमध्ये दारू गुटखा सगळं बंद करून दाखवा मग तुम्हाला मी मानतो. तसेच नोकरी धंदा नाही तर काय करतील बेरोजगार ? असा सवाल अशोक कोकाटे यांनी केलाय.

एकंदरीत, बेरोजगारी अन् त्यातून आलेल नैराश्य आजच्या कमी काळात श्रीमंत होण्याची स्वप्न बघणाऱ्या युवाईला अवैध मार्गांकडे वळत आहे. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करताना तरूण दिसत आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा पुढाकार आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे हाताला काम देण्याचे धोरण या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जालीम औषध आहे. येणाऱ्या काळात ओस पडलेल्या एमाआयडीसीत  उद्योग, व्यवसाय, कारखाने तसेच आयटी कंपन्यांसह मोठ्या कंपन्या जिल्ह्यात येऊन रोजगार निर्माण झाल्यास भविष्यात तरूण वर्ग निश्चितच अवैध मार्गांपासून दूर राहतील. अन् पालकमंत्री श्री. राणेंना अपेक्षित सिंधुदुर्ग देखील घडेल एवढं मात्र निश्चित आहे.