गिर्ये, रामेश्वर,पडेलमध्ये होणार कायदेविषयी जनजागृती..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 11, 2024 14:04 PM
views 44  views

देवगड : देवगड येथील गिर्ये, रामेश्वर,पडेल येथील भागांमध्ये मोबाईल व्ह्यान मधून कायदेविषयी जनजागृती देवगड तालुका विधी सेवा समिती देवगड यांच्या  व तालुका बार असोशियन देवगड, यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील गावांमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कायदेशीर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी गिर्ये येथील ग्रामपंचायत तसेच रामेश्वर ग्रामपंचायत २७ फेब्रुवारी रोजी पडेल ग्रामपंचायत या ठिकाणी मोबाईल व्हॅन  लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गिर्ये ग्रामपंचायत येथे २६ रोजी सकाळी १० वाजता  लोकअदाल तीचे  आयोजन करण्यात आले आहे. या सदर आयोजित शिबिरात अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड गिरीश भिडे हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. तर रामेश्वर ग्रामपंचायत येथे सकाळी ११:३० वाजता आयोजित शिबिरात अॅड संगीता कातेकर,अॅड अन्वि कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. २७ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामपंचायत पडेल येथे आयोजित मोबाईल लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश  न्यायदंडाधिकारी वर्ग देवगडचे श्रीमती एन. बी. घाटगे,पॅनल सदस्य अँड मैथिली खोबरेकर, आदी  मार्गदर्शन करणार आहेत.  मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील तसेच वादग्रस्त प्रकरने ठेवण्यात आली आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावेअसे आवाहन देवगड दिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. बी. घाटगे यांच्या कडून करण्यात आले आहे.