पं. अजित कडकडे - इंदुरीकर महाराज येतायत सिंधुदुर्गात !

Edited by: विनायक गावस
Published on: October 01, 2023 16:59 PM
views 479  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे आणि सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज येणार आहेत. त्यांना ऐकण्यासाठी चाहत्यांची गर्दी होणार आहे. 

माडखोल बेबीवाडी येथे प.पु. अवधूतानंद महाराज यांच्या शंभराव्या जन्मोत्सव निमित्ताने  २ ते ५ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने दाणोली येथील प. पु. सद्गुरू साटम महाराज मठापासून श्री क्षेत्र माडखोल प. पु.अवधूतानंद महाराज मठापर्यंत भव्य पालखी सोहळा ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. तर ५ ऑक्टोबर रोजी जेष्ठ निवेदिका सौ मंगलाताई खाडीलकर निरूपण करणार आहेत. तर रात्री १२ वाजता भक्ती संगीत रजनी गंधर्व पंडित अजित कडकडे सादर करणार आहेत.

तसेच भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत कुडाळ येथे श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज कीर्तन प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही सोहळ्यात चाहत्यांची गर्दी होणार आहे.