
देवगड : देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमानुसार येथील शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक विद्यामंदिरला वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आला. मोंड पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळ, मोंड विद्यामंदिर या संस्थेस वॉटर फिल्टर प्रदान करण्यात आला.
मोंड ग्रामपंचायतीच्यावतीने मोंड पंचक्रोशी शिक्षक प्रसारक मंडळ, मोंड या संस्थेस वॉटर फिल्टर यावेळी प्रदान करण्यात आला. या उपक्रमामुळे संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेश राणे आणि मोंड पंचक्रोशी शिक्षण संस्था तसेच शाळेच्या मुख्यध्यापक आसावरी सुनिल कदम यांनी मोंड ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.










