
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या मातीच्या घरांचे फेर सर्वेक्षण करून त्यांना घरकुलांचा लाभ देण्यात यावा याबाबतचे एक निवेदन शिवसेना महिला विभाग प्रमुख जेनिफर लोबो यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेत सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाचे लोक आहेत. आमच्या सर्वे व माहितीनुसार बरीच कुटुंब आजही मातीच्या घरात रहातात. शासनाने पक्क्या घराची योजना जाहीर केली होती. त्यातही सर्वेक्षण करून ती पक्की करावी असा शासनाचा आदेश होता. असलेली मातीची घरे धोकादायक स्थितीत आहेत. त्यांचे अजून सर्वेक्षण झालेले नाही.
तालुक्यातील ग्रामपंचायतीना तात्काळ आदेश देण्यात यावेत की, अल्प संख्यांक समाजाच्या घरांचे फेर सर्वेक्षण करून ज्यांची मातीची घरे आहेत त्यांच्या पक्क्या घरासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावेत. अन्यथा सर्व अल्प संख्यांक समाजाला घेवुन आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असाही इशारा लोबो यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.