वायरी प्रभागातील विकासकामांसाठी निधी द्या | आप्पा लुडबेंची पालकमंत्र्यांकडे मागणी

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 11, 2023 16:15 PM
views 86  views

मालवण : वायरी प्रभागातील आडवण भागातील गणेश विसर्जन स्थळ हे रस्त्यालगत असून खोल आहे. ते बांधणे आवश्यक आहे. तसेच लगत वस्ती असल्याने सुशोभीकरण  करण्याची आवश्यकता आहे. तसेच मुस्लिम महोल्यालगत कब्रस्थान आहे. या कब्रस्थानात वजूखाण्याची इमारत नादुरुस्त असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्याचेही बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. सदर काम मागील चार वर्ष पाठपुरावा करूनही अल्पसंख्यांक निधी न मिळाल्याने होऊ शकले नाही तरी वरील दोन्ही कामांसाठी आपण जिल्हा नियोजन मधून निधी दयावा अशी मागणी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.