
कणकवली : फोंडा बाजारपेठ ते हवेलीनगर पर्यंत मोठ्या प्रमाणात व्यपारी वसाहत व औद्योगिक निर्मिती असणारे प्रकल्प आहेत. तसेच येथे बाजापेठ असल्या करणारे लोकवस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी असलेला विजेचा पुरवठा हा कमी क्षमतेचा असल्याकारणाने वारंवार विजेच्या समस्या जाणवत आहेत. या मार्गावर थ्री फेज लाईन ओढण्याकरीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी कडून अनेक वेळा महावितरण चे फोंडा कार्यालय येथे विनंती अर्ज दिलेले आहेत. परंतु अद्याप यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून आज महावितरण चे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना निवेदन दिले व त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर माळी यांनी लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल असा शब्द दिला. तसेच स्मार्ट मीटर व शेती पंपा बाबत शिवसेनेचे शिष्टमंडळ उद्या जेई यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, राजू राठोड, विलास गुडेकर, महिला तालुकाअध्यक्ष माधवी दळवी, वैदेही गुडेकर, उपतालुकाध्यक्ष संजना कोलते, दिव्या साळगावकर, धनश्री मेस्त्री आदी फोंडा गावातील नागरिक उपस्थित होते.