कुंभार्ली पाणी प्रश्नावरील आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित

Edited by: मनोज पवार
Published on: May 29, 2025 12:12 PM
views 125  views

मंडणगड :  तालुक्यातील कुंभार्ली गावाच्या पाणीप्रश्ना संदर्भात दुषित पाण्याच्या विहिरीला पर्यायी नवीन विहीर बांधून देण्याची मागणी करत कुंभार्लीच्या ग्रामस्थांनी 28 मे 2025 रोजी मंडणगड पंचायत समिती समोर  आंदोलन केले प्रशासनाने  पंधरा दिवसाच्या आत नवीन विहिरीचे काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन  आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर  आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

कुंभार्ली गावाची नळपाणी योजनेकरिता बांधण्यात आलेल्या विहिरीचे पाणी दुषित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याकरिता संबंधितांकेे अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासनाच्या वतीने  कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.  पाणी पुरवठा विभाग कागदपत्रांचे सोपस्काराचे कारण पुढे करत या विषयासंदर्भात वेळकाढू धोरण राबवत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आंदोलनाचे  वेळी ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्यांची नवीन विहिरीची मागणी प्रशासनाने मान्य केली. व पंधरा दिवसाच्या आत विहिरीचे काम सुरु करणार असल्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या उपभियांता कविता जवादे यांनी यानंतर पंचायत समितीच्या आवारातील आंदोलनकर्ते ग्रामस्थांच्या सर्वांसमोर ग्रामस्थ प्रतिनिधींना या आशयाचे अधिकृत लेखी पत्र उपाभियांता कविता जवादे यांनी सुपूर्द केले.

यावेळी गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, मनसेचे प्रदेश सचिव वैभव खेडेकर, कुंभार्ली गावाचे ग्रामस्थ सचिन संवादकर, संतोष कलमकर, मारुती म्हाप्रळकर, आनंद कळमकर, राकेश म्हाप्रळकर, अशोक चिपळूणकर,रंजना म्हाप्रळकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कुंभार्ली गावाचे ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.