
वैभववाडी : बदलापूर येथीलविद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचाराविरोधात ठाकरे सेनेने आज निषेध केला. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला.
बदलापूर येथील घटनेसह राज्यात महीलांवरील होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. मात्र हायकोर्टाच्या आदेशानुसार हा संप मागे घेण्यात आला. यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी राज्यभर विविध पद्धतीने आंदोलन केले. वैभववाडी तालुक्यातही ठाकरे सेनेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बदलापूर सह राज्यात महीलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेंचा निषेध केला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे तालूकाप्रमुख मंगेश लोके जिल्हा कार्यकारणी सदस्य संदिप सरवणकर, युवसेना जिल्हा चिटणीस - स्वप्नील धुरी ,युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर,सरपंच - जितेंद्र तळेकर,विभाग प्रमुख - गणेश पवार ,उपविभाग प्रमुख यशवंत गवणकर, उपविभाग प्रमुख स्वप्नील रावराणे ,नगरसेवक - रणजीत तावडे ,सुनील रावराणे,संदेश सुतार, जयेश पवार,योगेश गुरव,बाळा पाळये आदी उपस्थित होते.