संभाजी भिडे यांच्या वक्तव्यविरोधात संताप ; सावंतवाडीत कॉंग्रेसकडून निषेध

Edited by: विनायक गावस
Published on: August 01, 2023 12:44 PM
views 82  views

सावंतवाडी : संभाजी भिडे यांच्या वक्तव्य विरोधात राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने गांधी चौकात राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.


 संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात परंतु यावेळी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यावरील विधानावरून मंगळवारी सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने गांधी चौक येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.


यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर अॅड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंचारी, रविद्र म्हापसेकर, शहर अध्यक्ष ॲड.राघवेद्र नार्वेकर, अॅड. संभाजी सावंत, संजय लाड समीर वंजारी अमिदी मेस्त्री स्मिता वागळे माया चिटणीस, सपना वेंगुर्लेकर, अण्णा केसरकर, संदिप सावंत समिर भाट आनंद कुभार संतोष मडगावकर मिनिंद गोम्स, बबन डिसोजा आदी उपस्थित होते.