
सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व देशप्रेमी नागरिकांच्यावतीने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. काश्मीरमधील पेहेलगाममध्ये पाकीस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबाच्या संबंधीत आतंकवाद्यांनी धर्माची विचारणा करुन २६ निरपराध हिंदूंची गोळ्या घालून निघृण हत्या केली. उद्दामपणे महिलांशी वागणूक केली. केवळ हिंदू असल्याबद्दल निष्पाप लोकांचा जीव घेताना कपडे उतरवून मुस्लिमपणाची खात्री करुन घेतली. याचा निषेध नोंदवत पाकिस्तानचा ध्वज जाळून शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
आज संध्याकाळी गांधी चौक येथे संध्याकाळी विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळत शहीद हिंदू बांधवाना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. पाक विरोधात देशभक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सकल हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, विलास जाधव, स्वराज्य संघटनेचे राजू कासकर, श्रीपाद सावंत, दिलीप भालेकर, दिनेश गावडे , अरुण वझे, सौ. रांगणेकर, मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, मेघना राऊळ, सुकन्या टोपले, श्रीशा कुलकर्णी आदींसह भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.