भ्रष्टाचाराऱ्यांना संरक्षण ही मोदींची गॅरंटी

'संविधान' की 'मनुस्मृती' हे ठरवून बटन दाबा : डॉ. विश्वंभर चौधरी
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2024 05:20 AM
views 343  views

सावंतवाडी : महाराष्ट्रात मोदी-शहां विरोधी लाट आहे. त्या लाटेत भाजपचा पराभव निश्चित आहे. २०० च्यावर भाजप जाणार नाही. हक्काच्या राज्यात भाजप डळमळीत आहे.२०२४ ची निवडणूक बाबासाहेबांच संविधान टिकणार की मनुस्मृती येणार ? याची आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण गरजेचे आहे.चारसो पारची हवा गेलेली आहे‌. दोनशेच्यावर भाजप जाणार नाही. सत्तांतर होणार हे निश्चित आहे असं मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केलं. सावंतवाडी येथील 'निर्भय बनो' या सभेदरम्यान ते बोलत होते‌.

सावंतवाडी गांधी चौक येथे डॉ. विश्वंभर चौधरी व अँड. असिम सरोदे यांची 'निर्भय बनो' सभा झाली. यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले, नागरिक हे लोकशाहीचा भाग आहे असं पोलिसांना वाटत की नाही ? जर व्यासपीठावर लावलेल्या तसबीरी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे राजकीय असतील तर ही सभा राजकीय समजा. आम्ही कुणाचा प्रचार करत नाही. लोकशाहीसाठीची ही सभा आहे. संसद सार्वभौम आहे. आम्ही प्रक्षोभक बोलत नाही. सिंधुदुर्गात प्रक्षोभक बोलायला आमची गरज नाही. रक्त सांडून आमच्या वाडवडीलांनी स्वातंत्र्य मिळवल. आता लोकशाही व संविधान धोक्यात आल्याने आम्ही इथे आहोत. राजकारणात जायची आमची इच्छा नाही. तर महाराष्ट्रात मोदी-शहा विरोधी लाट आहे. त्या लाटेत भाजपचा पराभव निश्चित आहे. २०० च्यावर भाजप जाणार नाही. हक्काच्या राज्यात भाजप डळमळीत आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. तर कोकणावर विनाशकारी प्रकल्प लादले जातात अन् हिऱ्याचे प्रकल्प गुजरातला जातात. आम्ही विकास विरोधक नाही. तुमच्या सोशण करणाऱ्या विकास मॉडेलला आमचा विरोध आहे. अदानीला बोलल्यावर मोदी-शहांना राग आला. विरोधी पक्ष नसावा असं म्हणणारे एक पंतप्रधान या देशात आहेत. सुड आणि खुन्नस असं भाजपचे राजकारण आहे. जे हुकुमशाहीच आहे. सामान्य माणसाच आयुष्य बदलेल असा एक कायदा मोदी-शहांना आणता आला नाही. आमचा विरोध रामाला नाही. रामाचा बाजार मांडण्याचा जो प्रकार होतोय त्याला आमचा विरोध आहे. तुमचा राम नथूराम आहे, आमचा राम गांधींचा आहे. आमच्या रामाला बायकोची अॅलर्जी नाही‌‌. इंग्रजांची मदत करणाऱ्या संघटनेकडून आम्हाला नकली राष्ट्रवाद शिकवला जात आहे. तो आम्हाला मान्य नाही. ज्ञानेश्वर, रविंद्रनाथ टागोर, विनोबा भावे यांचा राष्ट्रवाद आमचा आहे. मोदी-शहा आमचे भाडेकरू आहेत. त्यांनी मालकाच्या नादी लागू नये, मालक हे लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे ध्यानात घ्यावं. २०२४ ची निवडणूक बाबासाहेबांच संविधान टिकणार की मनुस्मृती येणार ? याची आहे. त्यामुळे लोकशाही टिकवण गरजेचे आहे. एककाळ नारायण राणे तिकीट द्यायचे. आज नारायण राणेंना तिकीटासाठी वाट पहायला लावली. एकनाथ शिंदे २०-२० दिवस तिकिटासाठी मोदी-शहांकडे बसले. निर्बुद्ध मंडळी राज्यात बसली आहे. माध्यमांचे मालक विकले गेले आहेत. त्यामुळे पत्रकारांनी लिहीलेल माध्यमातून येत नाही. दहा वर्षांत मोदी पत्रकार परिषदेंना सामोरे गेलेले नाहीत. आतापर्यंतच भ्रष्ट सरकार देशातील मोदी व राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकार आहे. भ्रष्टाचाराऱ्यांना संरक्षण ही मोदींची गॅरंटी आहे. ईडीन आपली पातळी काय झालीय ती समजून घ्यावं. चारसो पारची हवा गेलेली आहे‌. दोनशेच्यावर भाजप जाणार नाही. सत्तांतर होणार हे निश्चित आहे. शेतकरी, महिला, आंबेडकरी जनता यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्रात धुव्वाधार पराभव निश्चित आहे. २०२४ ला मतदान यंत्रांवर बटन दाबताना मनुस्मृती नको, संविधान निवडा असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, महाराष्ट्र धर्म आता जागृत झाला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना भाजपने दिलेली वागणूक पहाता भाजपला मत द्यायचं नाही हे जनतेन ठरवलं आहे. विधानसभेला एकनाथ शिंदे भुईसपाट होणार तर अजित पवार दिसणार नाहीत. लोकसभेत देखील जनता भाजपला बळी पडणार नाही.

घोटाळेबाज लोकांना भाजपने आपल्यासोबत घेतल. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख एकमेकांवर बोलत होते. पण, सुसंस्कृत राजकारण ते करत होते. देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती बिघडविण्याच काम करत विध्वंसक राजकारण महाराष्ट्रात आणल. भारतीय संविधानाची फसवणूक झाली आहे. नारायण राणेंना काही दिवस आराम करू द्या. निवडणूकीचा लढा लोकांनी हाती घेतला असून ही लढाई लोकशाही विरूद्ध हुकुमशाही असा आहे. नरेंद्र मोदी विरुद्ध सामान्य जनता अशी आहे‌. आजच्या सभेत मी कुणाबद्दल बोललो ते वैयक्तिक नसून प्रवृत्तीबद्दल आहे‌. कुणाला खूपल तर माझ्यावर केस दाखल करा असं अँड. असिम सरोदे म्हणाले.याप्रसंगी अँड. संदीप निंबाळकर, अँड. किशोर वरक आदी उपस्थित होते.