
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या पाच ग्राम विकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी, १३ ग्रामसेवकांना ग्राम विकास अधिकारी पदावर, पाच कनिष्ठ सहायक या पदावरून वरिष्ठ सहायक पदावर, तीन कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना वरिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी या पदावर तर पाच कनिष्ठ सहायक यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर बढती दिली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी एकूण ३१ जणांना पदोनती दिली आहे.
ग्रामविकास अधिकारी ते विस्तार अधिकारी या पदावर वस्त्याव पिंटो, वेताळ-बांबार्डे प्रामविकास अधिकारी यांची वैभववाडी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी, नारायण माणगावकर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग यांची मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग येथे, आत्माराम परब यांची तेंडोली जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे, गणेश परब यांची हरकूळ खुर्द येथून देवगड पंचायत समिती कृषी विभाग येथे, श्रीरंग जाधव सावंतवाडी पंचायत समिती येथून दोडामार्ग पंचायत समिती ग्रामपंचायत विभाग येथे पदोनतीने बदली केली आहे. १३ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती दिली आहे.
यात शामसुद्दिन साटविलकर, देवगड-महाळुंगे यांची देवगड पडेल येथे, भालचंद्र सावंत यांची ग्रामपंचायत सरमळे, कोनशी येथून सावंतवाडी मळेवाड ग्रामपंचायत येथे, आनंद परब, सावंतवाडी सातुळी-बावळाट येथून सावंतवाडी माजगाव येथे, चंद्रकांत शेडगे यांची सावंतवाडी, केसरी-फणसवडे येथून सावंतवाडी मळगाव येथे, महेश चव्हाण यांची कुडाळ बांबुळी येथून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग येथे, राजेंद्र सावंत यांची कणकवली डांबरे-तिवरे येथून कणकवली नांदगाव येथे, प्रफुल्ल धुरी यांची सावंतवाडी धाकोरे येथून कणकवली वरवडे येथे, अरविंद कांबळे यांची कणकवली नडगिवे-वायंगणी येथून वैभववाडी नाधवडे येथे, सहुरु गावडे यांची वेंगुर्ला अणसूर येथे, राजेंद्र देसाई यांची दोडामार्ग कुडासे येथून वेंगुर्ले उभादांडा येथे, मिलन सावंत- देसाई यांची दोडामार्ग पंचायत समिती येथून कणकवली नाटळ येथे, राजेश निवतकर यांची कुडाळ चेंदवण येथून कणकवली सांगवे येथे, संतोष कविटकर यांची कुडाळ वर्दे येथून कुडाळ पिंगुळी येथे पदोन्नतीने बदली करण्यात आलीआहे.
कनिष्ठ सहायक ते वरिष्ठ सहायक या पदावर पाच जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. यात जतिन ठाकूर यांची कुडाळ बांधकाम उपविभाग येथून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग येथे, दर्पणा आठल्येकर यांची जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा येथून जिल्हा परिषद बांधकाम येथे, योगेश गावडे यांची जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा येथून न जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग येथे, रवींद्र चव्हाण यांची कुडाळ लघु मी पाटबंधारे उपविभाग येथून कुडाळ लघु रु पाटबंधारे उपविभाग येथे, पूजा डेगवेकर यांची कुडाळ एकात्मिक बालविकास सेवा योजना येथून जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे, तर ओमकार चव्हाण यांची मालवण पंचायत समिती येथून जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. तीन कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना सहायक प्रशासन अधिकारी या पदावर की बढती देण्यात आली आहे. यात मधुकर राठोड जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण त विभाग येथे, संतोष चव्हाण यांची वेंगुर्ले पंचायत समिती येथून जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभाग येथे, गणपत देसाई यांची दोडामार्ग पंचायत समिती येथून वैभववाडी पंचायत समिती येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.
पाच कनिष्ठ सहायक यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये संतोष टक्के वैभवाडी पंचायत समिती येथून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग येथे, सचिन मिठबावकर यांची मालवण पंचायत समितीतून जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे, नितीन आरोंदेकर यांची सावंतवाडी पंचायत समितीतून दोडामार्ग पंचायत समिती येथे, सूरज देसाई यांची वेंगुर्ले पंचायत समिती येथून वेंगुर्ले पंचायत समिती येथे, सुनील देवरुखकर यांची वैभववाडी गटशिक्षण विभाग येथून जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे पदोन्नतीने बदली केली आहे.