ठाकरे गटाच्यावतीने कणकवलीत नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम !

असं आहे नियोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 09, 2023 11:13 AM
views 388  views

कणकवली : सालाबादप्रमाणे रविवार १५ ऑक्टोबर २०२३ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ साजरा होत आहे त्यानिमित्ताने खालील कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

असे आहेत कार्यक्रम !

रविवार दि.१५ ऑक्टोबर २०२३ : सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन, १०वा. देवीची विधिवत पूजा व आरती, सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक, सोमवार दि.१६ ऑक्टोबर २०२३ : सायं.७.३० वा. डबलबारी, श्री लिंगेश्वर प्रा. भजन मंडळ, भरणी घोटगे, बुवा-श्री विनोद चव्हाण, गुरुवर्य-बुवा चिंतामणी पांचाळ, पखवाज- श्री.महेश परब /तबला-श्री तुषार लोट विरुद्ध श्री वडची देवी प्रा.भजन मंडळ,लिंगडाळ, देवगड, बुवा-श्री संदीप लोके, गुरुवर्य- बुवा विजय परब, पखवाज-श्री योगेश सामंत / तबला-संदेश सुतार, मंगळवार दि.१७ ऑक्टोबर २०२३ : सायं.-५ वा. चक्री भजन स्पर्धा, बुधवार दि.१८ ऑक्टोबर २०२३ : सायं ६वा. निमंत्रित संघांची फुगडी, गुरुवार दि.१९ ऑक्टोबर २०२३, सायं.-७.३० वा. लोकराजा कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय मंडळ,नेरूर यांचा ट्रिकसीन युक्त नाट्यविष्कार अजिंक्यतारा भाग २, शुक्रवार दि.२० ऑक्टोबर २०२३ : सकाळी १०वा. सहस्त्रनामावली पठन, सायं.६ वा.- देवीचा गोंधळ, श्री मेघनाथ गोसावी,चांगदेव गोसावी (राजापूर, कोंडये ) यांचा बहारदार देवीचा गोंधळ, शनिवार दि.२१ ऑक्टोबर २०२३ : सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायं. ५ ते ७ वा. पखवाज वादन, पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत स्वर ताल एक प्रवास( जगन्नाथ संगीत विद्यालय ) सायं.- ७.३० वा. डबलबारी : ओम चैतन्य प्रा.भजन मंडळ,मुंबई (उंबर्डे वैभववाडी) बुवा- श्री श्रीकांत शिरसाट गुरुवर्य- बुवा कै चंद्रकांत कदम, पखवाज - अमोल पांचाळ, तबला- महेश तळेकर विरुद्ध श्री सातेरी प्रा.भजन मंडळ,दिवा बुवा-श्री जनार्दन पेडणेकर, गुरुवर्य-बुवा सुहास सुर्वे, पखवाज- सागर कदम, तबला-विश्वास पेडणेकर, रविवार दि.२२ ऑक्टोबर २०२३ : सायंकाळी ५ वाजता कुमारिका पूजन, सायं. ६वा. होममिनिस्टर, सोमवार दि.२३ ऑक्टोबर २०२३ : सायं.७.३० वा. तिरंगी भजनांचा सामना, श्री सिद्धिविनायक प्रा भजन मंडळ बापर्डे, बुवा -श्री महेश नाईकधुरे, गुरुवर्य-बुवा अजित गोसावी, पखवाज- शेखर घाडी विरुद्ध श्री मालविर भूतनाथ प्रा भजन मंडळ, पाळेकरवाडी देवगड, बुवा - श्री शुभम पाळेकर, गुरुवर्य - बुवा श्री विजय परब, गुणाजी पाळेकर, पखवाज - सर्वेश पाळेकर, तबला- ओंकार लबडे विरुद्ध श्री भूतनाथ प्रा भजन मंडळ, शिवडाव, बुवा - श्री गंनजय तेली, गुरुवर्य- बुवा श्री विनोद चव्हाण, पखवाज-तुषार लोट, तबला- विराज राणे, मंगळवार दि.२४ ऑक्टोबर २०२३ : सायं.- ४ वा. आपटा पूजन, सायं-७.३० वा. दशावतारी नाटक, आरोलकर दशावतार नाट्य मंडळ,आरवली, बुधवार दि.२५ ऑक्टोबर २०२३ : दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक, सूचना- दररोज दुपारी २ ते ६ स्थानिक भजने , दररोज सकाळी ९ वा.देवीची पूजा व आरती व सायंकाळी ७.३० वा .आरती


अध्यक्ष श्री रामदास विखाळे खजिनदार प्रमोद मसुरकर यांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.