श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान इथं १० मे ला कार्यक्रम !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 09, 2024 10:45 AM
views 92  views

सावंतवाडी : कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ९ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वाजता श्री पुरुषोत्तम याग, दुपारी २ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ४ श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. डॉ. नामदेव गवळी आणि मयूर गवळी यांनी केले आहे.