वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रम !

वैभववाडी बौध्द सेवा संघ - माता रमाई महिला मंडळ यांचं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 12, 2023 19:28 PM
views 103  views

वैभववाडी :  वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्यावतीने शनिवार दिनांक १४ आक्टोबर २०२३ रोजी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

   यानिमित्त सकाळी ११ वा. धम्मध्वजारोहण व बुध्द पूजापाठाचे संचलन संघाचे  बौध्दाचार्य करणार आहेत. दुपारी १२ ते १ वा. धार्मिक प्रवचन, तर दुपारी १ ते २ वा. समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. स्नेहभोजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे सचिव रविंद्र पवार यांनी केले आहे.