
दिल्ली : मेरी मिट्टी मेरा देश अंतर्गत कोकण बेल्टमधून भाजप युवा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेले विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी कोकणातील भाजपच्या युवक कार्यकर्त्यांसह दिल्लीमध्ये कार्यक्रम सादर केला आहे.
यावेळी कोकण प्रांतातील भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांना दिल्लीमध्ये नेत त्यांनी हा उपक्रम साजरा केला आहे. यावेळी शेकडो भाजपचे कार्यकर्ते कोकणातून दिल्ली येथे दाखल झाले होते.
महाराष्ट्र भाजप युवा प्रदेश मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विशाल परब आणि प्रथमेश तेली यांनी झंझावती कार्यक्रम करण्यास सुरुवात केले आहेत. आज दिल्लीमध्ये जात हा कार्यक्रम सादर करत भाजप पक्ष वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी भाजप प्रदेश युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, प्रदेशचे कोकण प्रभारी प्रयास भोसले, प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब, प्रथमेश तेली,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.