
मंडणगड : शेनाळे येथील महाराष्ट्र पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरूण ढंग यांना जेजेटी विद्यापीठ, राजस्थान यांच्यावतीने संगणकशास्त्र विषयातील पीएच.डी पदवी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
प्राध्यापक अरुण ढंग यांनी जेजेटी विद्यापीठामध्ये प्रभावी शिक्षणासाठी उच्च शिक्षणात, शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास या विषयावर प्रदीर्घ संशोधन केले आहे. प्राध्यापक अरूण ढंग यांनी संगणक शास्त्र, भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी घेतली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. सतरा वर्षाहून अधिक कालावधीपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी वेगवेगळया विभागाचे कामकाज पाहिले. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात स्टार एज्युकेशन अवॉर्ड प्राप्त झालेला आहे.
शोध प्रबंधासाठी प्राध्यापक डॉ. प्रज्ञा वानखडे, यांचे मार्गदशन त्यांना लाभले. डॉ. हनुमंत रेणुसे, प्रा. अभिजित देसाई, डॉ. डी. जगताप, डॉ. सचिन भोसले, डॉ. विनायक पुजारी, डॉ. अमित जाधव, डॉ. रिंकेश छेडा यांचे सहकार्य त्यांना नेहमीच लाभले. संशोधनाबद्दल पीएच.डी. जाहीर झाल्याबद्दल दळवी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अजय दळवी, रजिस्ट्रर विशाल नटे यांच्यासह शिक्षक व तालुक्यातील सर्वच स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.