प्रा‌. प्रवीण बांदेकरांच्या 'अरतें ना परतें'चे चिपळूणात प्रकाशन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 11:15 AM
views 81  views

सावंतवाडी : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या 'अरतें ना परतें' या ललित लेखन संग्रहाचे प्रकाशन शनिवार 27 एप्रिल रोजी चिपळूण येथे होत आहे. पपायरस प्रकाशन, मुंबई यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेले लेख दोन वर्षांपूर्वी दै. लोकसत्ताच्या रविवारच्या लोकरंग पुरवणीतील प्रा. बांदेकरांच्या अरतें ना परतें याच नावाच्या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाले होते. वर्षभर चालवलेल्या या सदरातील हे सर्व लेख वाचकप्रिय ठरले होते. 

या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी व नाटककार राजीव नाईक, कवी व चित्रकार गणेश विसपुते, समीक्षक डाॅ नीतीन रिंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. चिपळूण येथील प्रयोगभूमी, कोळकेवाडी या ठिकाणी सकाळी 11वाजता हा कार्यक्रम पपायरस प्रकाशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.