
सावंतवाडी : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित व कोकणसाद प्रस्तुत ४ सप्टेंबरला आयोजित केलेल्या महावाचन स्पर्धेतील प्रथम १५० स्पर्धक विजेत्यांना शालेय स्तरावर बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरावर घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे १८० स्पर्धाकांनी सहभाग घेतल्या यातील १५० बक्षीस पात्र स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
वाचन संस्कृती अधिक वृंधिगत व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने यावर्षी राज्यात महावाचन महोत्सव आयोजित केला होता. त्या अंतर्गत कोकणसाद च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही वाचा आणि जिंका आकर्षक बक्षीस या अंतर्गत महावाचन उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सहावी ते बारावीच्या विध्यार्थ्यांना करण्यात आले होते.
२ ते ५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या महावाचन उत्सवात विध्यार्थ्यानी जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर या उत्सवात वाचनाचे महत्व या बाबत मनोगत पाठवत सहभागी झालेल्या १५० स्पर्धकांना जाहीर करण्यात आलेलं बक्षीस वितरण त्या त्या तालुक्यातील सहभागी स्पर्धकांना शाळा स्तरावर नुकतेच करण्यात आले आहे..