'मोस्ट व्हायरल बाप्पा' स्पर्धेचं बक्षीस वितरण 26 मार्चला

'कोकणसाद LIVE' च्या 9 व्या वर्धापनदिनाचं औचित्य
Edited by: ब्युरो
Published on: March 24, 2023 16:23 PM
views 549  views

सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल कोकणसाद LIVE च्यावतीने गणेश सजावट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. मात्र, यावेळी स्पर्धेचं स्वरूप थोडंस हटके होतं. यंदा 'मोस्ट व्हायरल बाप्पा' या थीमने घेण्यात आलेल्या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला. कोकणचं नंबर 1 महाचॅॅनेल 'कोकणसाद LIVE' च्या 9 व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत 26 मार्चला या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. याला उपस्थित राहण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आलंय.

 कोकणातल्या वाडीवस्तीवरील बाप्पांचे दर्शन जगभरातील कोकणवासीयांना घेता यावे, यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE नं यावर्षी प्रथमच मोस्ट व्हायरल बाप्पा, ही ग्लोबल गणेश स्पर्धा घेतली होती. कोकणात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ग्लोबल स्पर्धेला पहिल्याच वर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. कोकणातील ही पहिलीच ग्लोबल स्पर्धा ठरली. जगभरातून हजारोंच्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. आकार बिल्डर्स & डेव्हलपर्स, मुख्य प्रायोजक तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्रावणी अगरबत्ती आणि श्रीराम बोअरवेल यांचं सह प्रायोजकत्व याला लाभलं होतं. कोकणचं नंबर १ महाचॅॅनेल कोकणसाद LIVE च्या 26 मार्चला होणाऱ्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत मोस्ट व्हायरल बाप्पा या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे.

यात घाडीगावकर मालवण ओवळीये यांनी प्रथम क्रमांक, महेंद्र बाबाजी चव्हाण, आदर्शनगर, चौकुळ, सावंतवाडी यांनी दुसरा क्रमांक, सुमीत सत्यवान नाईक, मळेवाड-जकातनाका, नाईकवाडी, सावंतवाडी, तिसरा क्रमांक मिळवला. तर अक्षय दिपक निवळे, कोलगाव-सावंतवाडी, अभिषेक घाडी, धवडकी, माडखोल सावंतवाडी, दुर्गानाथ शिरगावकर, बिबवणे, पळसेवाडी, कुडाळ, सिध्देश श्रीपादराव सुर्वे, खासकीलवाडा, सावंतवाडी, अभय अनिल कदम, सरंबळ कुडाळ, संतोष अमृत परब, मातोंड,  वरचे बांबर, मिशाळ परिवार, जिल्हा परिषद शाळा नंबर, दोन, उभा बाजार सावंतवाडी, गजानन रत्नोबा कुडतरकर, रतांबेवाडी कणकवली, नवलराज विजयसिंह काळे, सडूरे, सोन धरणे तालुका वैभववाडी, किशोर बजरंग कुबल, तारकर्ली, मालवण  यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावलेत. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.


सावंतवाडी येथील राजवाडा इथं रविवारी 26 मार्चला सायंकाळी 6 ते 8 या वेळेत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन टीम कोकणसाद LIVE आणि मुख्य संपादक सागर चव्हाण यांच्यावतीने करण्यात आलंय.