परतीच्या प्रवासासाठी खासगी बसचे दर दुप्पट !

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 24, 2023 13:07 PM
views 242  views

कणकवली : कोकणात मोठ्या संख्येने आलेले गणेशभक्त परतीच्या प्रवासासाठी निघत आहेत. पण परतीच्या प्रवासासाठी खासगी बसचे दर आता एसटीच्या भाड्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आकारले जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. सावंतवाडी कुडाळ कणकवली वरून मुंबईला जाण्याचे साध्या बसचे तिकीट दर 1500 रुपये आहेत तर स्लीपरचे दर 3000 रुपये झाले आहेत.

 एसटी प्रशासनाने ठरवलेल्या दरापेक्षा दीडपट दर आकारावेत अशी सूचना आरटीओ विभागाकडून देण्यात आली तरी देखील हे दर 3000 रुपये पर्यंत पोहोचले आहेत  आणि प्रवासी तिकीट देखील खरेदी करतात असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

आरटीओ विभागाच्या वतीने ज्यादा दर आकारल्यास आपल्याला त्या खाजगी बस गाडीचा नंबर व तिकिटाचा फोटो या व्हाट्सअप नंबर वर  98228 42333 पाठवण्याचे आवाहन आरटीओच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पण ऑनलाईन पद्धतीने आकारण्यात येणारे या दरावर प्रशासन कोणती कारवाई करणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.