
सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त झाराप तलाठी कार्यालयास प्रिंटर भेट स्वरूपात देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते रफीक शेख यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी श्री. शेख यांचे तलाठी कार्यालयाकडून आभार मानले. यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते.