प्राथमिक केंद्र शाळेला प्रिंटर

Edited by:
Published on: July 01, 2025 15:06 PM
views 47  views

कुडाळ : कुडाळ शहरातील जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेला आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी प्रिंटर भेट दिला या शाळेसाठी प्रिंटर आवश्यक होता.

शहरातील जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिकतात आणि या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका किंवा अन्य काही प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी प्रिंट काढण्यासाठी खर्च करावा लागतो या विद्यार्थ्यांना हा खर्च वाचावा या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक आनंद नवार यांनी शाळेसाठी आवश्यक असणारा प्रिंटर मिळवा अशी मागणी नगरसेवकांकडे केली होती. ही मागणी कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण केली. हा प्रिंटर शाळेला भेट स्वरूपात आज शुक्रवारी देण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, तसेच शाळेचे शिक्षक मिनीनाथ आडसरे, यल्लाप्पा दळवी, योगेश जाधव, सौ प्राजक्ता वेतुरेकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.