'पंतप्रधान आवास', पाणीप्रश्नी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

ठाकरे शिवसेनेने वेधलं लक्ष
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 05, 2025 12:16 PM
views 211  views

देवगड : देवगड मधील विविध समस्या तातडीने सोडवन्यात याव्यात यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध समस्यांकडे ठाकरे गट शिवसेना पक्षाच्यावतीने नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजना, घनकचरा व्यवस्थापन यांसह पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करीत आपल्या मागणीचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी सूरज कांबळे यांना देण्यात आले.

विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर येथील ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी श्री. कांबळे यांची भेट घेण्यात आली. या निवेदनात असे म्हटले आहे, देवगड जामसंडे नगरपंचायत मार्फत ज्यांना घर नाही अशा लोकांना पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली होती. यामध्ये सुरू केलेले बांधकाम गेली सुमारे तीन चार वर्षे बंद होते. त्याबाबत चौकशी केली असता, बांधकामाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून २०२२ मध्ये खंडेलवाल समिती आली होती. या समितीने पहाणी करून आपला पहाणी अहवाल नगरपंचायतीकडे पाठवलेला आहे. संबंधित केलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून संबंधित बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याची, नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात यावा. तसेच संबंधित ठेकेदाराला (जुन्या) सुमारे १५ लाख रुपये दंड ठोठावला असून इतर अनेक ताशेरे मारल्याचे समजते. असे

पाण्यासाठीचे नियोजन काय ?

देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी शिरगाव पाड़ाघर व दहिबांव अन्नपूर्णा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात पाडाचर येथून पाणी येतच नाही. तसेच अन्नपूर्णा नदीवरून येणारी पाईप लाईन जीर्ण झाली असल्याने अनेक वेळा फुटत असते. साहजिकच ती दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा खंडित होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेतला ? वाची माहिती द्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

असतानाही संबंधित ठेकेदाराने बांधकाम चालू केले आहे, याबाबत मुख्याधिकारी म्हणून काय कारवाई केली ते बांधकाम पाडणार आहात की नाही? नगरपंचायत मार्फत शहरातील नागरिकांकडून ओला व सुका कचरा घंटागाडीमार्फत संकलन केला जातो. त्याचा कर नगरपंचायत घेत

आहे. परंतु, १ ते ६ मार्चपर्यंत कक्षा संकलन बंद होते. त्यामुळे नागरिकांचो गैरसोय झाली याला जबाबदार कोण? या सर्वांची उत्तरे आठ दिवसांत न मिळाल्यास शहरातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा  यावेळी उबाठा शिवसेना देवगड च्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, माजी सभापती रेश्मा सावंत, नगरसेवक नितीन बदिकर, प्रफुल्ल कणेरकर, दिनेश पारकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.