पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची "मन की बात ख्रिस्ती बांधवों के साथ"

वेंगुर्ले भाजपाचा अनोखा उपक्रम
Edited by: दीपेश परब
Published on: December 25, 2022 19:06 PM
views 304  views

वेंगुर्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम वेऺगुर्ले तालुक्यात भाजपा पदाधिकारी यांनी ख्रिसमस निमित्त येथील ख्रिस्ती बांधवांसोबत पाहण्याचे आयोजन करून एक अनोखा उपक्रम घेतला. 

     प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या रविवारी असणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजप पदाधिकारी आपल्या बुथ वर कार्यकर्ते व नागरिकांसह आवर्जून पहातात. परंतु या वेळी हा कार्यक्रम नाताळनिमित्त परबवाडा येथील ख्रिस्ती बांधवांसोबत पहाण्याचे नियोजन भाजप पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई व भाजप पदाधिकाऱ्यांनी यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. 
   पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे विचार सर्व स्तरातील लोकांना पोहचविण्यासाठी वेंगुर्ले भाजपच्या वतीने शेतकरी बांधवांसोबत , काॅलेज युवकांसोबत , महीलांसोबत, आशा स्वयंसेवीकांसोबत मन की बात  कार्यक्रमाचे आयोजन यापूर्वी केले होते . परंतु ह्यावेळेस नाताळचे औचित्य साधून ख्रिस्ती बांधवांसोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी सांगितले.
   यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,  प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, ता.सरचिटनीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर ,  ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, परबवाडा सरपंच पप्पू परब, ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत, कार्तिकी पवार, स्वरा देसाई ,  बुथ प्रमुख संजय मळगावकर, जिल्हा का.का.सदस्य बाळा सावंत,युवा मोर्चाचे तुषार साळगावकर, सचिन सावंत, निलेश मांजरेकर , मयुरेश परब, अक्षय परब, निलेश मांजरेकर, सायमन आल्मेडा, इनसीन फर्नांडिस, दुवाट फर्नांडिस, शिरीन आल्मेडा, सायेर आल्मेडा, पास्कु आल्मेडा, स्टीवन आल्मेडा, सुलोरीन डीसोजा, सोफिया डीसोजा, फियाद फर्नांडिस, ग्लानेस फर्नांडिस, कोव्हेल फर्नांडिस, लविना फर्नांडिस, लिबेरीन फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस, अँना डीसोजा, घरपीर डीसोजा, येतान फर्नांडिस, निसलस फर्नांडिस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .