केंद्रीय योजनांचा फायदा थेट जनतेला घेता आला, हेच पंतप्रधान मोदींच यश !

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 26, 2022 19:09 PM
views 137  views

सिंधुदुर्गनगरी : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविल्या. त्या जनतेला सुखकर ठरल्या आहेत. या योजना ग्रामिण भागातील जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. या सर्वच योजनांचा निधी त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करुन सर्व योजना जनतेच्या विश्वासास पात्र ठरल्या आहेत. राज्यातील १३ कोटीपैकी ५ कोटी ६५ लाख जनतेला गरिब कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.


येथील माध्यमिक पतपेढी सभागृहात धन्यवाद मोदीजी अभियान झाल. यात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणीस  प्रभाकर सावंत, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, युवराज लखमराजे, दादा साईल आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, सरकारी योजनेचे अनेक लाभार्थी उपस्थित होते. 

कोरोना काळात झालेले लसीकरण व केंद्र सरकारने या साथीत केलेल्या कामाबद्दल माजी पंचायत समिती सदस्या व या भागातील धडाडीच्या महिला नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांनी आपल्या मनोगतात सरकारच्या कामाबाबत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात राबविलेल्या लसीकरणाबाबत गौरवोद्गार काढले. नागरीकांना सरकारच्या या योजनांमुळे शुध्द पाणी, गँस, अशा गरजेच्या सेवांचा लाभ मिळाला. अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी स्वप्नाली गोसावी, किसान सन्मान योजनेचे लाभार्थी अनुजा नेरुरकर, उज्वला योजनाच्या लाभार्थी स्वरा गावडे,  जलजीवन मिशनबद्दल दिलीप तवटे यांनी धन्यवाद व्यक्त केले.


दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सिडको लगतच्या वसंत स्मृती ट्रस्टच्या वास्तूमधील भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणिस प्रभाकर सावंत यांनी अभियान व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.