पंतप्रधान मोदींच निलेश राणेंनी केलं स्वागत

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 05, 2023 10:31 AM
views 260  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मालवण बोर्डिंग मैदान येथे आगमन होताच भाजपा कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॅलिकॉप्टरने मालवणच्या बोर्डिंग मैदान येथे आगमन झाले. त्यांच्या स्वागताची भाजपने जय्यत तयारी केली होती. हजारो कार्यकर्त्यांनी बोर्डिंग मैदान येथे गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅलिकॉप्टर मधून उतरताच भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी - मोदीच्या घोषणा दिल्या.