पंतप्रधान तारकर्लीसाठी रवाना..!

Edited by:
Published on: December 04, 2023 16:14 PM
views 213  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर त्यांचा ताफा हा तारकर्लीसाठी रवाना झाला आहे. तारकर्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौसेना दीन साजरा होणार आहे. पंतप्रधान ज्या मार्गाने जाणार आहेत त्या सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी पर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावर भारतीय नौसेना दीन साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.