
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला शाखेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात आले. सर्वप्रथम शिक्षक समितीचे संस्थापक भा. वा.शिंपी गुरुजी, जॉन रॉड्रिग्ज गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिवसातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कोकण विभाग सचिव संतोष परब, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, तालुका कार्याध्यक्ष किरण मुडशी यांनी आपले बहुमोल विचार प्रकट केले. यानंतर सभासद नोंदणी व संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तालुका शाखेमार्फत कोकण विभाग सचिव संतोष परब यांना प्रातिनिधिक स्वरूपात सभासद पावती देऊन या अभियानाचा शुभारंभ केला गेला. तसेच मठ कणकेवाडी शाळा येथे वेंगुर्ला तालुक्यातील राज्य व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोकण विभाग सचिव संतोष परब, शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख शंकर वजराटकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस कर्पूरगौर जाधव, तालुकाध्यक्ष प्रसाद जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक सिताराम लांबर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भोई यांच्या हस्ते वृक्षारोपण
यानंतर कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू कातकरी वसतिगृह येथे भेट देऊन तेथे वास्तव्यास असलेल्या मुलांना आवश्यक असणाऱ्या औषध व गोळ्यांचे वितरण व खाऊ वाटप वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत करण्यात आले. तेथील मुलांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यातून मुलांना आरोग्यदायी, दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन तालुका शाखेमार्फत दिले. यावेळी या वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेंगुर्ला शाखेमार्फत राबवलेल्या या उपक्रमाबद्दल तालुका शाखेचे आभार मानले व धन्यवाद दिले.
यावेळी तालुकाध्यक्षप्रसाद जाधव , तालुका सचिव रामा पोळजी , शिक्षक समिती जुनी पेन्शन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख शंकर वजराटकर, जिल्हा कोषाध्यक्ष कालिदास खानोलकर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस कर्पूरगौर जाधव, शिक्षक पतपेढी वेंगुर्ला शाखा संचालक सिताराम लांबर, अंतर्गत हिशोब तपासनीस रामचंद्र मळगावकर, विभागीय अध्यक्ष प्रकाश भोई, शिक्षक नेते सिताराम नाईक, तालुका सचिव रामा पोळजी, तालुका कार्याध्यक्ष किरण मुडशी, महिला आघाडी अध्यक्ष ऋतिका राऊळ, महिला आघाडी सचिव सरोज जानकर, महिला आघाडी शिक्षक नेत्या नेहा गावडे, मठ केंद्र संघटक राजश्री भांबर, सल्लागार एकनाथ जानकर, सिद्धेश्वर मुंडे, कणकेवाडी शाळेचे मुख्याध्यापक वीरधवल परब आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.