सुजाता पडवळ सारस्वत ब्राम्हण समाज वेंगुर्लेच्या अध्यक्ष !

उपाध्यक्ष दिगंबर नाईक, खजिनदार सुधीर झांटये, सचिव अमृता पाडगांवकर यांची निवड
Edited by: दीपेश परब
Published on: January 19, 2023 16:49 PM
views 784  views

वेंगुर्ले : सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुजाता पडवळ, उपाध्यक्षपदी दिगंबर नाईक, खजिनदारपदी सुधीर झांटये, सचिवपदी अमृता पाडगांवकर तर उपसचिवपदी अवधूत नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.

वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालयात सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारीणीची पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकारीणी निवड तसेच येणाऱ्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यासाठीची सभा दिगंबर नाईक यांया अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 या सभेत सुरवातीस पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सुजाता पडवळ, उपाध्यक्षपदी दिगंबर नाईक, खजिनदारपदी सुधीर झांटये, सचिवपदी अमृता पाडगांवकर तर उपसचिवपदी अवधूत नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारीणीत सदस्य म्हणून संजय पुनाळेकर, राखी दाभोलकर, प्रसाद साळगांवकर, सुषमा प्रभू - खानोलकर, सीमा नाईक, स्मिता नाबर, अॅड. प्रथमेश नाईक, अमोल आरोसकर, हेमा गावस्कर, अमोल खानोलकर, सचिन वालावलकर, तृप्ती आरोसकर, स्वाती पोतनीस, अजय खानोलकर यांची निवड करण्यात आली.

या सभेत येणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीत सारस्वत ब्राम्हण समाज सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी व सदस्यांना विश्वासात घेऊन विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करणार असून इतर समाजासाठी सुध्दा आदर्शवत असे काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुजाता पडवळ यांनी स्पष्ट केले. तसेच सोमवार दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता स्वामिनी मंगल कार्यालय येथे वेंगुर्ले तालुक्यातील सारस्वत ब्राम्हण समाजातील महिलांसाठी मकर संक्राती निमीत्त हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. या हदळीकुंकू समारंभास समाजातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्षा सुजाता पडवळ यांनी केले आहे. शेवटी सचिव अमृता पाडगांवकर यांनी आभार मानले.