सावर्डेत पोवाड्यांचं सादरीकरण

Edited by: मनोज पवार
Published on: July 05, 2025 20:12 PM
views 45  views

सावर्डे : कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे येथे नुकताच एक भव्य लोककला कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबई पथक यांनी पारंपरिक पोवाड्यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान, महात्मा फुले यांचे स्त्री उद्धारासाठीचे कार्य, तसेच झाडपूजा आणि पर्यावरणसंवर्धनाची संस्कृती या विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. 'स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले त्यांनी मुलीचे शिक्षण केले खुले ' जैतापूराच्या नावानं अनुऊर्जाचा घाट  ,राजा आला कोह्वापूराचा अशी विविध गाणी आणि पोवाडा सादर केले. पोवाडे केवळ सांस्कृतिक अभिव्यक्ती नव्ह, तर त्यामध्ये सामाजिक संदेशही ठळकपणे मांडण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणासाठीचे संघर्ष, महात्मा फुले यांचे स्त्री सक्षमीकरणासाठीचे प्रयत्न, आणि भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेचे महत्त्व या सर्व विषयांना शाहीरानी लोककलेच्या माध्यमातून उजाळा दिला.

 विशेषतः झाडपूजा संस्कृतीवर आधारित पोवाड्याने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.  कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या मराठी विभाग व इतिहास आय. क्यु. इ सी. संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्राचार्य टी. वाय. कांबळे यांनी व मुंबई कला पथक सादरीकरणाचे कौतुक करत सांगितले की, “लोककला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे.”या कार्यक्रमासाठी मुंबई कला पथकाचे पत्रकार दीपक पवार, प्रा. सुनील कदम संदीप कुरणे अश्विन शाहीर, शाहीर शंतनू, अनिकेत खेटर यांनी कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचन प्रा. सुनील जावीर यांनी केले  तर आभार प्रा. संकेत कुरणे यांनी मानले.