राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात..!

▪️ शिक्षणमंत्री केसरकरांच जातिनिशी लक्ष ▪️ शिक्षण विभाग, भोसले नॉलेज सिटीनं कसली कंबर
Edited by: विनायक गावस
Published on: February 09, 2024 08:53 AM
views 129  views

सावंतवाडी :* शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामने 51 वं राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन उद्या 10 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिमखाना मैदान सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलं आहे. या भव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यभरातील निवडक अशा तब्बल 500 वैज्ञानिक प्रतिकृती या बालवैज्ञानिक प्रदर्शनात पहायला मिळणार आहे.

तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या होमग्राउंडवर हा भव्य सोहळा होत असल्यानं त्यांनी यात जातीनिहाय लक्ष घातल आहे‌. आज रात्री ते सावंतवाडीत येणार असून याचा आढावा घेणार आहेत. तर शिक्षण विभाग, इतर संस्थांसह कोकणात शिक्षणाचा ब्रॅण्ड उभं करणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. ‌दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वीकारली आहे. सावंतवाडी येथे होणाऱ्या या बालवैज्ञानिक प्रदर्शनास राज्यभरतील मंडळी येणार आहेत. राज्यभरातील निवडक पाचशेहून अधिक वैज्ञानिक प्रतिकृती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. विद्यार्थांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला व कौशल्याला वाव मिळणार आहे.

जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी प्रदर्शन कालावधीत खुले राहणार आहे. जवळपास 500 स्टॉल, सभामंडप या ठिकाणी उभारण्यात आला आहे. जेवण, प्रसाधनगृहासह आपत्ती व्यवस्थापनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने या प्रदर्शानास भेट द्यावी असं आवाहन शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांसह शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.