राष्ट्रवादीच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात !

अर्चना घारेंचं उपस्थित राहण्याचं आवाहन
Edited by: विनायक गावस
Published on: October 12, 2023 13:37 PM
views 123  views

सावंतवाडी : पक्षाध्यक्ष शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या सावंतवाडीत होत असून कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी केले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी मधील रविंद्र मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यकर्ता मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात असून 

माजी मंत्री तथा आमदार  बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांनी केले आहे.