कुसुरच्या वाडिया जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

९ व १० जानेवारीला होतोय जत्रोत्सव
Edited by:
Published on: January 08, 2024 12:41 PM
views 91  views

वैभववाडी : कुसूर गावच्या श्री रामेश्वर व देवी  दारुबाईचा वाडिया जत्रोत्सव ९ व१०जानेवारीला होत आहे.जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कुसूर गावचा वाडिया जत्रोत्सव दरवर्षी कार्तिक  महिन्यातील शिवरात्री अमावास्येला संपन्न होतो.यावर्षी काही तांत्रीक अडचणींमुळे हा जत्रोत्सव एक महीना उशीराने होत आहे.

येत्या बुधवारी (ता.९) हा जत्रोत्सव सुरू होणार आहे.पहील्या दिवशी (ता.९)ला मंदिरात मांड भरणे व देवीला नैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम होणार आहेत.जत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीची ओटी भरणे,नवस बोलणे फेडणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. दोन दिवसीय होणा-या या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे.यानिमित्ताने मंदिर परिसरात मंडप,विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान मंडळाकडून करण्यात आले आहे.