डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुकास्तरीय जयंती उत्सवाची जय्यत तयारी

शेकडोंच्या संख्येने उपस्थितीत राहणार तालुक्यातील भीमबांधव
Edited by:
Published on: April 06, 2024 13:49 PM
views 174  views

दोडामार्ग : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा. तालुकास्तरीय जयंती उत्सव भव्य स्वरूपात  साजरा करण्याचे नियोजन दोडामार्ग मध्ये करण्यात आले आहे. आर. पी. आय. (आठवले), सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई), तालुका शाखा दोडामार्ग, जय भीम युवा मंडळ रमाईनगर झरेबांबर आणि भीम वॉरीयर्स पंचशील नगर दोडामार्ग यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. येत्या रविवारी १४ एप्रिलला दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये मोठया उत्साहात साजरा होणार असून त्याची जय्यत तयारीही युद्ध पातळीवर सूरु करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मंत्री मा. दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती शनिवारी आयोजकांकडून देण्यात आलीय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दर वर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते. या वर्षीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती कार्यक्रम  दोडामार्ग येथ येथे मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला  प्रमुख पाहूणे म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर,आर.पी.आय. (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव आयु. रमाकांत जाधव, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन कृष्णा आयनोडकर (उपसरपंच ग्रा. पं. झरे-२ तथा खजिनदार: सिंधुदुर्ग बौध हितवर्धक महासंघ मुंबई तालुका शाखा दोडामार्ग, विशेष निमंत्रित गणेशप्रसाद गवस (माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग), शंकर झिलू जाधव (सचिव आर. पी. आय. (आठवले) कोकण विभाग तथा अध्यक्ष :-सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ (मंबई) तालुका शाखा दोडामार्ग), प्रकाश लक्ष्मण कांबळे (जिल्हा सरचिटणीस आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग, प्रमुख वक्ते आदरणीय धम्मचारी तेजबोधी (त्रिरत्न बौध्द संघ सिंधुदुर्ग), अंकुश जाधव (माजी समाज कल्याण अधिकारी जि. प. सिंधुर्ग), स्वागताध्यक्ष आयु. रामदास कांबळे (तालुका अध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), त्याचं बरोबर आयु. चंद्रकांत जाधव (जिल्हा उपाध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग),आयु. सखाराम कदम (कार्याध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) सिंधुदुर्ग जिल्हा,आयु. नवसो वसंत पावसकर (सचिव आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), आयु. मनोहर गोविंद जाधव (उपाध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग), श्रीमती. ज्योती रमाकांत जाधव (नगरसेविका नगरपंचायत कसई - दोडामार्ग), श्रीमती. क्रांती महादेव जाधव (नगरसेविका नगरपंचायत कसई - दोडामार्ग), पत्रकार शंकर मधुकर जाधव, आयु. संदीप आनंद जाधव (सचिव जय भीम युवा मंडळ रमाई नगर झरेबांबर), आयु. प्रेमानंद यशवंत पालयेकर (कार्याध्यक्ष आर. पी. आय. (आठवले) दोडामार्ग) सह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी  ९.३० वा. प्रतिमा पुजन, बुध्द वंदना, त्रीसरण पंचशिल, सकाळी १०.०० वाजता विशेष सत्कार, सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजता मान्यवरांची मनोगते,दुपारी २.०० ते ३.०० वाजता भोजन, दुपारी ३.०० ते सं. ४.०० वाजता भीमगितांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी  कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.