
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावारूपास असलेल्या अभय राणे मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी ARM प्रो कबड्डी लीग ची तयारी आता अंतिम टप्प्यात अली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय होणाऱ्या या प्रो कबड्डी चे उद्घाटन उद्या सायंकाळी ७ वा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होणार आहे. भव्य अशा प्रकाश झोतात खेळवल्या जाणाऱ्या या प्रो कबड्डी साठी आता कबड्डी प्रेमी आतुर झाले आहेत
पुरुष गटामध्ये नामांकित ८ संघ सहभागी झाले आहेत तर महिला गटांमध्ये नामांकित ९ संघानी या प्रो कबड्डी मध्ये सहभाग घेतला असल्याने भव्य अशी होणारी प्रो कबड्डी पाहण्यासाठी कबड्डी प्रेमी आतुर झाले आहेत